चाळीसगाव । चाळीसगाव तालुका क्रिडा रत्नांची खान असल्याचे प्रतिपादन खासदार ए.टी.नाना पाटील यांनी येथील बी.पी. आर्टस, कॉलेजच्या ट्रॅकवर उभारण्यात आलेल्या ईंटरनॅशनल दर्जाच्या इनडोअर क्रीडा संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी 22 एप्रिल रोजी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल होते प्रमुख अतिथी म्हणून आमदार उन्मेषदादा पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, माजी आमदार राजीवदादा देशमुख होते. प्रास्तविक प्राचार्य प्रकाश बाविस्कर यांनी केले. उपप्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी क्रिडा संकुलाची माहिती दिली. व्यासपिठावर व्हा.चेअरमन ज.मो.अग्रवाल, उपाध्यक्ष संजय रतन पाटील, संचालक मंडळातील भोजराज पुन्शी, डॉ.एम.बी.पाटील, मंगेश राजपूत, चंद्रकांत पाखले, भुषण ब्राह्मणकार, गोपाळ दायमा, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, उद्धवराव माळी, डिंगबर बुंदेलखंडी, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.वाणी उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
खा.. ए.टी.पाटील म्हणाले की, तालुकास्तरावर नामवंत खेळाडू घडत असतांना ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळवुन त्यांना देखील देशपातळीवर नावलौकिक करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. त्याउद्देशाने आता खेलो इंडीया या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील क्रीडा क्षेत्रात सुवीधा देण्यासाठी ग्रामीण भागात देखील स्टेडियमसाठी अनुदान मिळवता येणार आहे. त्यासाठी संबधितांनी त्याबाबतचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवावेत त्याचा मी स्वतः पाठपुरावा करेन, असे देखील खासदार पाटील यांनी यावेळी सांगीतले. माजी आमदार राजीव देशमुख म्हणाले की, क्रिडा संकुलात अनेक क्रिडा प्रकार पहावयास मिळणार आहे. त्यामुळे अनेक चांगले खेळाडू तयार होतील. आमदार उन्मेष पाटील म्हणाले की इनडोअर स्टेडीअममुळे क्रिडा विकासाचा लौकीक वाढेल. तालुक्यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले तर नारायण अग्रवाल यांनी संस्थेचे ज्युनियर कॉलेज व हायस्कूलच्या नवीन इमारत आणि शहरात जलतरण तलाव हा इंटरनॅशनल स्वरुपाचा व्हावा, यासाठी खासदारांनी सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी या कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.