चाळीसगाव- नगरपरीषदेच्या मराठी शाळा क्रमांक 1 ,4 ,7 व 16 या शाळेमध्ये वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सर्वांची व सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत 165 विद्यार्थ्यांना 100 किलो फराळ मिठाई चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी रंगभरण, रांगोळी, नृत्य, धावणे, चित्रकला, बेडूक उड्या,संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोते उड्या, हस्ताक्षर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली. वसुंधरा फाउंडेशनतर्फे शाळेचे शिक्षक निवृत्ती उंबरकर, कैलास पाटील, द्यानेश साळुंखे, अनिल पेठे, दिनेश परचुरे, राखी ठोके, भालेराव मॅडम, रोडे सर, प्रतिभा पाटील, नितीन राठोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार म्हणाल्या की, चाळीसगाव शहरातील अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे पालीकेच्या शाळेतील विद्यार्थी मित्रांसोबत दिवाळीचा आनंद घेता आला व त्यांच्या आनंदात सहभागी होता आले याचे मोठे समाधान आहे. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सुनिल भामरे, गजानन मोरे, संजय पवार, देवेन पाटील, धर्मराज खैरनार, प्रशांत चौधरी, रविराज परदेशी, आशुतोष खैरनार, प्रशांत वानखेडे, विनायक दवे यांनी परीश्रम घेतले.