चाळीसगाव तालुक्यात मुकबधीर तरुणीवर अत्याचार

Mukbadhir girl assaulted in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करीत नंतर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील विकृत नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे.

पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 25 पीडीता मूकबधीर असून गावाजवळील एका तलावाजवळ तीन संशयीतांपैकी दोघांनी डोक्यावर मारहाण केली तसेच एकाने पीडीतेवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवार, 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते सोमवार, 5 डिसेंबरच्या पहाटे पाच वाजेपर्यंत घडली.

धुळे रुग्णालयात उपचार
पीडीतेने घरी येवून कुटुंबाला ही घटना सांगितल्यानंतर तिला धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष शिक्षिकेसमोर इशार्‍याने पीडीतेने हा सर्व प्रकार सांगितला तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल, असे तिने सांगितले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.