चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू

0

चाळीसगाव । तालुक्यातील पोहरे येथील निंबा चिंधा सूर्यवंशी (57) हे 23 सप्टेंबर 2017 रोजी घरुन दवाखान्यात जातो असे सांगुन निघुन गेले होते ते घरी परतले नाही म्हणुन त्यांचा मुलगा दिपक निंबा पाटील यांनी दि 25 सप्टेंबर 2017 रोजी मेहुणबारे पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद केली होती.

26 सप्टेंबर 2017 रोजी पोहरे गावाशेजारी असलेल्या विहीरीत निंबा सूर्यवंशी यांचा मृतदेह सकाळी 6 वाजेच्या सुमारास मिळुन आला असुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला पोलीस पाटील पोहरे ता चाळीसगाव रामकृष्ण माळी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास साहाय्यक फौजदार पी एन कुमावत करीत आहेत. दुसर्‍या घटनेत भोरस खुर्द (ता चाळीसगाव) शिवारातील निर्मलाबाई साजनदास वासवानी यांच्या शेतातील विहीरीत एका अनोळखी 42 वर्षीय महीलेचा मृतदेह दिनांक 26 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास मिळुन आला आहे याप्रकरणी आनंदा सुकदेव पाटील रा भोरस खुर्द ता चाळीसगाव यांनी दिलेल्या खबर वरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलिस उपनिरिक्षक रमेश मानकर करीत आहेत.