चाळीसगाव-नागद महामार्गावर कार उलटली : चाळीसगावच्या महिलेचा मृत्यू ; चौघे जखमी

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव ते नागद मार्गावरील हातले गावाजवळ शनिवारी सकाळी कार उलटून झालेल्या अपघातात एका चाळीसगावातील महिलेचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत.

भरधाव कार उलटली
चाळीसगाव शहरातील संदीप ताराचंद बेदमुथा हे आपल्या कुटुंबासह चारचाकी (एम.एच.04 एफ.एफ. 9523) ने जात असतांना हातले गावाजवळ त्यांची कार उलटली. या अपघातात त्यांच्या पत्नी कांचन संदीप बेदमुथा (47, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) या जागीच ठार झाल्या तर संदीप ताराचंद बेदमुथा यांच्यासह चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर अनेकांची धाव
अपघात शनिवारी सकाळी साधारणपणे नऊ वाजेच्या सुमारास झाला. संदीप बेदमुथा हे प्रतिष्ठीत व्यक्ती असून या अपघाताची माहिती मिळताच परी.रसरातील लोकांसह आप्तांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासह जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.