चाळीसगाव न.प.च्या इमारतीला महाराणा प्रतापसिंह यांचे नाव द्या- करणी सेना

0

चाळीसगाव-महाराणा प्रतापसिंह यांचे मातृभूमीसाठी त्याग व बलीदान सर्व विश्वाला प्ररीचीत आहे, म्हणून चाळीसगाव नगरपरीषदेच्या इमारत व सभागृहाला महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्याची मागणी न.प.मुख्याधिकारी यांना आज सोमवारी १७ रोजी चाळीसगाव राष्ट्रीय राजपुत करणी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नगरपरीषेदेच्या इमारत व सभागृहाला महाराणा प्रतापसिंग यांचे नाव देण्यासाठी नगरपरिषदेने ठराव कराव करून राजपुत समाज बांधवाचा स्वाभिमान भावनाचा आदर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रदेश महासचिव अभयसिंह राजपुत, तालुकाअध्यक्ष विरेंद्रसिंह राजपुत, शहर अध्यक्ष निलेश राजपुत, प्रदेश संपर्क प्रमुख प्रेमसिंह राजपुत, प्रदेश संपर्क प्रमुख प्रशांत राजपुत, प्रदेश महिला सचिव सुवर्णा राजपुत, नगरसेविका तथा प्रदेश उपाध्यक्ष (महिला ) सविता राजपुत, प्रदेश महामंत्री (महिला ) सुचित्रा राजपुत, जिल्हा संघटन प्रमुख दिपक राजपुत मगलसिंह राजपुत, प्रमोद पवार, विशाल राजपुत, विपुल राजपुत, सुरज पाटील, अनिल येवले, दिपक पाटील, मंगलसिंग राजपुत, अनमोल राजपुत, प्रकाश रावते, आकाश जगताप , सरदारसिंग राजपुत, विशाल राजपुत, नरेंद्र राजपुत आदींची स्वाक्षरी आहे. यावेळी नगरसेवक सोमसिंग राजपुत, नगरसेवक चंद्रकांत तायडे उपस्थित होते.