चाळीसगाव पंचायत समितीतर्फे उद्या होणार शौचालय अनुदान वाटप

0

चाळीसगाव। चाळीसगाव तालुक्यात स्वच्छ भारत अभियान व महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत वयक्तिक शौचालय अनुदान व शौचालय प्रशासकीय मंजुरीचे आदेश कोल्हापूर जिल्हा हाणदारी मुक्त करणारे कोल्हापूरचे माजी जि.प. अध्यक्ष भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नामदार जयकुमार रावल, आमदार उन्मेश पाटील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या बुधवार 19 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील हिरापूररोड वरील सुयश लॉन्स येथे वाटप करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्हा 100 टक्के ज्यांनी हागणदारी मुक्त केला ते माजी जि.प. अध्यक्ष भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने हागणदारी मुक्त अभियान सर्व सदस्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

अशी माहिती पं.स.च्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील व गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तालुक्यात ज्यांना शौचालय बांधायचे असेल त्यांनी संबंधित ग्रा.पं.शी संपर्क साधण्याचे आवाहन केले.