चाळीसगाव पालिकेचे आनंदवाडी भागात दुर्लक्ष

0

चाळीसगाव । शहरातील आंनदवाडी ही अनु.जाती, जमातीची 1963 पासुन वसलेली वस्ती मात्र गटारी, नाल्यातील पाणी पुलाखालुन पाईपातुन पास होत नसल्याने पावसाळ्यात 4 ते 5 फुट पर्यत पाण्याची पातळी वाढलेली असते सांडपाणी घरात शिरते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झालेला असतो, तसेच पिण्याचा पाण्याची पाईप लाईन आहे. मात्र पाणी नाही त्यामुळे नागरिकांनी मनस्ताप होत आहे. प्रबुध्दनगर, विमानतळ, नवलेवाडी, फुलेनगर, मिलींदनगर बंजारा कॉलनी इ.भागातुन सांडपाणी आंनदवाडीत येत असल्याने प्रचंड समस्या निर्माण झाली आहे.

उपाय प्रत्येक वार्डचे सांडपाणी विभागुन दिले पाहीजे, आनंदवाडीचा नाला ब्रिजकाँनर पर्यत भुयारी नाल्यात रुपांतर करने किवा ब्रिज खालुन मोठ्याव्यासाचा पाईप टाकणे, सध्या कमी व्यासाचा पाईप असल्याने खरी ही समस्या आहे. मात्र नगरपालिका टाईमपास करीत आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन आहे. दाब नसल्याने नळाला पाणी येत नाही. त्याच्या समस्याकडे नपाचे मुद्दाम दुर्लक्ष आहे त्याकडे नपाने गंभीर दखल घ्यावी नाहीतर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा ईशारा प्रा.गौतम निकम यांनी दिला आहे.