विज्ञान मंडळाचे उदघाटन सोहळा उत्साहात साजरा
चाळीसगाव – येथील आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यलयाचे नियतकालिक उन्मेष २०१७-१८चे प्रकाशन चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे संचालक मु.रा.अमृतकार यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.व्ही.चव्हाण हे होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, सिनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, संचालक मु.रा. अमृतकार, क.मा.राजपूत, डॉ.सुनील राजपूत, ॲड.प्रदीप अहिरराव, सुरेश स्वार, दादासाहेब बुंदेलखंडी, अ.वि.येवले, माजी आमदार घोडे, प्राचार्य मिलींद बिल्दीकर, उन्मेष संपादक डॉ. पंकज नन्नवरे, विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. डि.एन.उंदीरवाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयातील बॉटनी विभागात विज्ञान भित्ती पत्रिकेचे उदघाटन व विज्ञान मंडळाचे उदघाटन डॉ. एम.बी.पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रास्ताविक प्राचार्य एम.व्ही.बिल्दीकर यांनी केले तर उन्मेष संपादक डॉ.पंकज नन्नवरे व विज्ञान मंडळ प्रमुख प्रा.डि.एन.उंदीरवाडे यांनी माहीती दिली. तसेच मु.रा.अमृतकार व डॉ.एम.बी.पाटील यांनी उद्घाटन पर आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आपण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना केलेल्या कार्याचा लेखा जोखा हा उन्मेष या अंकात असणार आहे म्हणून आपण हा अंक आपल्याजीवनात संग्रही केला पाहिजे एखाद्या महाविद्यालयाचा अंक हा त्या महाविद्यालयाचा संपूर्ण दर्शन घडवणारा असतो. तसेच भारतातील संशोधन हे भास्कराचार्यां पर्यंत खूप चांगले होते परंतु नंतरच्या कालखंडा मध्ये संशोधन कमी कमी होत गेले त्यात अनेक कारणे आहेत आणि संशोधन करायचे असेल तर आपला अंधश्रद्धेवर असलेला विश्वास हा काढून टाकावा लागेल तरच संशोधनामध्ये आपण प्रगती करू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. गंगापूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मानले. उपप्राचार्य अजय काटे, उपप्राचार्य बि.आर येवले, हिलाल पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.