चाळीसगाव महाविद्यालयाच्या आवारात मोबाईल चोरी

0

चाळीसगाव । पॉलीटेक्निकल महाविद्यालयाच्या आवारात शाळेच्या दप्तरात ठेवलेला 10 हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन 3 जानेवारी 2019 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सायगाव येथील शुभम राजेंद्र सुर्यवंशी (वय-19) हा विद्यार्थी शहरातील कन्नड रोडवरील बायपास जवळ असलेल्या जुलालसिंग मंगतु राठोड पॉलीटेक्निकल महाविद्यालयात 19 नोव्हेंबर 2018 रोजी परीक्षा देण्यासाठी आला होता परीक्षा हॉल मध्ये दप्तर व मोबाईल घेवुन जाता येत नाही म्हणुन त्याने त्याचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल दप्तरमध्ये महाविद्यालयाच्या आवारात परीक्षा देण्यासाठी गेला परीक्षा संपल्यावर दुपारी 12 वाजता पाहीले असता त्यादरम्यान दप्तरातुन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे समजल्यावर मोबाईलचा शोध घेतला असता मिळुन आला नाही. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा केला आहे.