चाळीसगाव महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

0

महाविद्यालयात एटीएमची सुविधा होणार – अवसारे
चाळीसगाव – येथील आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात 14 रोजी हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताह कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पोस्टर प्रदर्शन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एम.व्ही. बिल्दीकर होते तर प्रमुख पाहुणे चाळीसगाव महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर चेतन अवसारे होते. सोबत विजय इंगळे, प्रवीण कछवा, उप प्राचार्य ए.व्ही. काटे, कार्यालयीन अधीक्षक हिलाल पवार आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना बँकेविषयी दिली माहिती
या प्रसंगी महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर चेतन अवसारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ई-बँकिंग विषयी सविस्तर अशी माहिती सांगितली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये या महाविद्लयात विद्यार्थ्यांसाठी एटीएम सुविधा सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले. यानंतर विजय इंगळे यानी विद्यार्थीना बँकची माहीती देत शैक्षिणीक लोन संदर्भात विद्यार्थीना मार्गदर्शन केले. तर प्रविण कछुआ यांनी ई-बँकिगचे महत्व सागीतले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
तसेच शेवटी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य बिल्दीकर म्हणाले कि, आपल्या भारतात दरवर्षी हिंदी दिवस १४ सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. हिंदी भाषेच्या ऐतिहासिक सोनेरी क्षणांना आठवून आजही संपूर्ण भारतात हिंदी दिवस साजरा केला जातो. भारतात जवळपास सर्वच लोक हे हिंदी भाषेचा वापर करीत असतात. प्रास्ताविक डॉ.सुनीता कावळे यांनी केले तर प्रा.वैशाली सोळंके यानी अतिथीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी भामरे, माधव पाटील, संदेश पोळ यांनी केले तर प्रा. चेतना अहिरराव यांनी आभार मानले.