चाळीसगाव । येथील महाविद्यालयातील एनसीसी विभागातील 3 विद्यार्थी आणि आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कुलमधील एक विद्यार्थींनी आदीती आवटे (कॅडेट) असे चार विद्यार्थ्याची निवड 26 जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी करण्यात आली आहे. अशोक महाजन (सिनिअर अंडर ऑफीसर), राहुल पाटील (ज्युनिअर अंडर ऑफीसर), अनिकेत परदेशी (कॅडेट) या विद्यार्थ्याचा समावेश आहे. एकाच वेळी 4 विद्यार्थ्याची या पथसंचलनासाठी निवड होण्याची चाळीसगाव येथील महाविद्यालयाची पहिलीच वेळ आहे. नवी दिल्ली येथे सदर विद्यार्थी गेल्या महीनाभरापासून पथसंचलनाची तयारी करत असून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ते पथसंचलन करणार आहे. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या बरोबर चर्चा व भोजन करण्याचा मान देखील त्यांना मिळणार आहे.
या एन.सी.सी. विद्यार्थ्याची निवडीमध्ये 48 महाराष्ट्र बटालीयन, धुळेचे कर्नल एस.गणपती, सुभेदार मेजर सादीक मोहंम्मद यांचे सह इतर बटालीयन सदस्यांचे योगदान लाभले आहे. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाचे प्रमुख प्रा. राजेश चंदनशिव, विजय निरखे (पर्यवेक्षक) यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल. या विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल मॅनेजीनं बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, सचिव वसंत चंद्रात्रे, डॉ. एम.बी. पाटील, भोजराज पुन्शी, मंगेश पाटील यांचे सह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी एज्युकेशन सोसायटी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, माजी उपप्राचार्य, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.