चाळीसगाव येथे कृषी केंद्राकडून शेतकर्‍यांची लुट

0

चाळीसगाव । चाळीसगाव येथे काही कृषी केंद्र चालकांकडून बी बियाणे, कीटक नाशके वस्तूवर 50 ते 100 रुपये जादा दराने विक्री करत असल्याची चर्चा सुरु आहे. दरवर्षी खते बियाणांच्या मोठ्या प्रमाणात काळा बाजार होण्याच्या – बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यांच्या – बोगस बियाण्या बाबतच्या बातम्या येत असतात. तसेस पुष्कळदा एखादे विशिष्ट बियाणे किंवा खत बाजारात उपलब्ध होत नाही. शेतकर्‍यांना मागणी प्रमाणे वेळेवर व रास्त दारात खत आणि बियाणे उपलब्ध होण्यास तसेच खत बियाणे पुरवठादार कंपन्या व विक्रेत्याकडून शेतकर्‍यांची फसवणूक होते. अशाच प्रकारे चाळीसगाव शहराची हे चित्र पाहावयास मिळत आहे. फवारणीस लागणार्‍या औषधांचा तुटवडा अशी अडचण दाखवून शेतकर्‍यांकडून 50 ते 100 रुपयाने शेतकर्‍यांकडून घेऊन आर्थिक लूट करीत असल्याचे समजते. मात्र याकडे पं.स.कृषी अधिकारी व सह.कृषी अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.