चाळीसगाव येथे निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार

0

गणेश विसर्जनाच्या दिवशी युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमीचा उपक्रम

चाळीसगाव – चाळीसगाव शहर निर्माल्य संकलन मोहीम २०१८’ अंतर्गत चाळीसगाव शहरात गणेश उत्सवातील निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी गणेश विसर्जनाच्या दिवशी युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमी यांच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे यात मोहीमेत सहभागी गणेशोत्सव मंडळांना युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. श्री. ना निरोप देते वेळी पर्यावरण रक्षणाचाही मंत्र जपला जावा, या उद्देशाने शहरातील युनिटी क्लब व पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. या उत्सव काळात जमा होणारे निर्माल्य एका ठिकाणी जमा करुन निर्माल्य संकलन मोहीमेत अर्पण करुन जलप्रदुषण टाळावे व या मोहिमेत सहभाग घ्यावा. मोहीमेअंतर्गत चाळीसगाव शहरातून निर्माल्य संकलन करून त्याची विगतवारी करण्यात येणार असून जमा होणारे निर्माल्याची योग्य विल्हेवाट केली जाणार आहे.

सहभाग नोंदविण्याचे आवाहन
शहरातील संपूर्ण गल्लोगल्ली निर्माल्य रथ फिरविण्यात येणार असून संकलन मोहिमेत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. निर्माल्य संकलन, प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि भाविकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन अशा विविध आयामांवर पर्यावरण प्रेमी काम करीत आहेत. स्वप्निल कोतकर, मनिष मेहता, प्रविण बागड, हेमंत वाणी, शरद पवार, गणेश सूर्यवंशी, भुपेश शर्मा, निशांत पाठक, स्वप्निल धामणे, गितेश कोटस्थाने, विशाल गोरे, निलेश जैन, योगेश ब्राह्मणकर, युवराज शिंपी, पियुष सोनगिरे, किरण पाटील, निलेश वाणी आदी पर्यावरण प्रेमींच्या वतीने ही मोहीम साकारण्यात येत आहे.