उमंग समाजशिल्पी महिला परिवार यांचा उपक्रम
चाळीसगाव – शहरात पाणी फाऊंडेशनची कार्यशाळा नुकतीच उमंग सृष्टी स्कुलमध्ये विजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा पाटील यांनी केले. स्मितल बोरसे व सुवर्णा राजपूत उपस्थित होत्या. व पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक विजय कोळी यांनी महिलांसी संवाद साधला. महाराष्ट्रातील ७६ तालुका म्हणून चाळीसगावची निवड झाली चाळीसगावातील डिसेंबर महिन्यातील अनुभव सांगतो. यामध्ये पाणी फाऊंडेशन कामासाठी फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक १४३ गाव १०८ ग्रामपंचायत तसेच अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. निसर्गाची शाळा या चित्रपट दाखविण्यासाठी १६ शाळांची निवड करून मुलांना धाम आनंद मिळणार आहे.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
विजय कोळी यांनी महिलांना ‘आनंदवाडी’ येथील स्लाईडशो दाखवून महिलांना मध्ये आत्मविश्वास व प्रेरणा दिली. पाणी फाऊंडेशन काम कसे चालते यांची माहिती देतांना महिलांशी खेळ कसे चालते यांची माहिती देतांना महिलांशी खेळ व मनोरंजनाच्या माध्यमातून महत्व सांगितले. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन निता चव्हाण यांनी केले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी उमंग कोअर गृप सदस्या कविता पाटील, प्रतिभा पाटील, माधुरी वाघ, रत्नप्रभा नेरकर उज्वला अमृतकार माधवी नांगरे, माधवी पाटील, ज्योती बडगुजर, मेनका जंगम, रेखा जोशी, कल्पिता पवार, आरस्ता माळतकर, मनिषा शेजवळकर, महानंद पट्टवत्कर, सारिका जैन अर्चना निकुंभ, विजया पाटील, व उमंग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.