चाळीसगाव येथे युवा नेतृत्व कार्यशाळेस प्रारंभ

0

चाळीसगाव  । नेहरू युवा केंद्र आणि साद फाऊंडेशनतर्फे युवा नेतृत्व व समुदाय विकास या पाच दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून के.की. मुस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकन गायकवाड, साद फाऊंडेशनचे अध्यक्ष विजया चव्हाण, के.की. मुस प्रतिष्ठानचे कार्यवाहक कमलाकर सामंत आदी उपस्थित होते. युवा नेतृत्वाचा विकास म्हणजे समुदायाचा विकास त्यामुळे नेतृत्वगुण विकासासाठी शाश्‍वत मार्ग अवलंबणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. बाविस्कर यांनी केले. तर कला ही माणसाला तरूण ठेवते असे मत गायकवाड यांनी मांडले. भारत हा युवांच्या नेतृत्वात विकसीत होईल असे मत अध्यक्ष अतुल निकम यांनी मांडले.

या कार्यशाळेला चाळीसगाव शहर व ग्रामिण भागातून चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पाच दिवस चालणार्‍या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन, चर्चा करण्यात येणार आहे. यशस्वीतेसा दिलीप चव्हाण, वैशाली निकम, विजया ठाकूर, हेमंत तोडे, पवन राणा, सागर नागणे, सागर आगोणे, कल्पतेश देशमुख, राजू मिस्त्री, योगेश राठोड आदींनी कामकाज पाहिले.