चाळीसगाव । सावित्रीबाई फुले व जिजाऊ माता यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत सेनेच्यावतीने कष्टकरी महिलांना प्रत्येकी 1 लाख रूपयांचा विमा पॉलिसी काढून दि. 6 रोजी रयत सेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्याचप्रमाणे काही नवनिर्माचित नगरसेवकांचा सत्कार देखील पवारवाडी स्थित विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आमदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले होते. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेश पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा येथील नगरसेवक अमोल शिंदे व डॉ. अभिजीत पाटील, डॉ. विनोद कोतकर, डॉ. संदिप देशमुख, डॉ. नरेंद्र राजपूत तर पाचोर्याच्या नगरसेविका विजया शिंदे, अमळनेर येथील नगरसेविका शितल यादव, डॉ. चेतना कोतकर, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, सुरेश स्वार, चंद्रकांत तायडे, नगरसेविका विजया पवार, सेलाबाई पाटील, तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे, सोमसिंग राजपूत, नगरसेवक चिराग शेख, विश्वास चव्हाण, सुधीर पाटील, विजय पाटील, बबन पवार, गणेश पवार, राजेंद्र यादव, लालचंद सोनवणे, पाचोरा येथील ललीता पाटील, शेख अल्लाउद्दिन आदि उपस्थित होते.
रयतसेनेतर्फे 40 महिलांचा काढला विमा
प्रास्ताविकातुन गणेश पवार यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगत रयत सेना समाज कारणाच्या माध्यमातून समाजसेवा करते, गरिब, गरजु व्यक्तींना मदत करून शेतकिर्यांचे प्रश्न सोडवत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वाव मिळावा म्हणून अनेकवेळा त्यांचा गुणगौरव करून शालेय साहित्य वाटप केले. शेतकर्यांना आर्थिक मदत दिली. असे अनेक छोटे मोठे उपक्रम रयत सेना राबवत असून समाजातील गोरगरीब कष्टकरी महिला कष्ट करून उदरनिर्वाह करता त्यांच्या संसाराचा गाडा चालवतात अशा महिलांना मदत म्हणून रतन सेनेच्यावतीने आज 40 महिलाचा प्रत्येकी 1 लाख रूपयाचा विमा आज मनस्वी आनंद होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे काल मार्केट कमिटीमधील काट्यावर मापात घोळ असल्याचे लक्षात येताच रयत सेनेने आवाज उठवून शेतकर्यांसोबत आंदोलन केले. शेतकर्यांना न्याय मिळून देण्यासाठी रयत सेना कटीबद्ध असून सावित्रीबाई फुले व माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आज या कार्यक्रमाचा योग आला असे सांगून मान्यवरांना धन्यवाद दिले.
आमदार उन्मेश पाटील यांनी केले कौतूक
अध्यक्षीय भाषणातून आमदार उन्मेष पाटील यांनी गणेश पवार व रयत सेनेचे विशेष कौतुक करत रयत सेना चांगले कार्य करत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीब, कष्टकरी महिलांना सावित्रीबाई फुले व माता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून 50 महिलांचा विमा काढून त्यांना मदत केली. प्रामाणिकपणे काम करण्याचा संघटनेच्या मागे समाजदेखील उभा राहतो. मी आमदार म्हणून रयत सेनेच्या कार्यास शुभेच्छा देतो, असे सांगिगतले. कार्यक्रमासाठी अधि परिश्रम पी.एन.पाटील, पप्पू पाटील, प्रमोद वाघ, बंटी पाटील, संजय कापसे, महेंद्र पाटील, प्रशांत अजबे, स्वप्निल गायकवाड, निवृत्ती कवडे, ज्ञानेश्वर कोल्हे, दिनेश चव्हाण, दिपक राजपूत, भूषण पाटील, मुकूंद पवार, भरत नवले, विकास पवार, विनोद पवार, दिनेश पाटील, विलास मराठे, चेतन पवार, शुभम देशमुख, अमित नागणे, सुरज ठाकुर, मंगेश देठे यांनी घेतले.