चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानची नियोजन बैठक

0

चाळीसगाव । सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रची पुढील काळातील कार्यक्रमाचे नियोजन बैठक शहरातील शासकीय विश्राम गृहात 28 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत 4 किल्ले दर्शन, संवर्धन मोहीमा, पाणीबचत, पाणी आडवा पाणी जिरवा योजनेची मोहीम, प्रतिष्ठानचे बालशिलेदार जय शरद पाटील व प्रणव अनिल कुडे यांचा कमी वयात साल्हेरचा किल्ला सर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विद्यालयीन विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करणे, पुढील महिन्यात सभासद नोंदणी सप्ताह घेणे, यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

महाराणा प्रताप यांना अभिवादन
हिंदूसुर्य मेवाडाधिपती महाराणा प्रताप यांच्या प्रतीमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दिलीप घोरपडे, विवेक रणदिवे, शुभम चव्हाण, रविंद्र सूर्यवंशी, शरद पाटील, निलेश हमलाई, आरीफ खाटीक, मुराद पटेल, विजय गायकवाड, राहुल पाटील, विनोद शिंपी, अजय जोशी, गौरव पाटील, राहुल हिलाल पाटील, बंसी जोशी, अनील कुडे, नाना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सागर चौधरी, योगेश शेळके, बालु पाटील, साहेबराव काळे, ज्ञानेश्वर ठाकरे, लिलाधर पाटील, जय पाटील, प्रणव कुडे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.