भाजपच्या जुन्या निष्ठावंतांचा विचार मंचतर्फे कार्यक्रम
चाळीसगाव- भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ तसेच जनसंघा पासून भारतीय जनता पार्टी थेट वाड्या वस्त्या तांडे तसेच गावं गल्ली ते आजचे आधुनिक शहरापर्यंत शत प्रती शत भाजपा पोहोचवणारे स्व.गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांची 69 वी जयंती निमित्ताने पोस्ट ऑफिस जवळील स्व. गोपीनाथ मुंडे विचार मंच तर्फे आदरांजली वाहण्यात आली यावेळी जमीनीशी जुळलेल्या सच्या कार्यकर्त्यांना राजकारणातल्या प्रवाहात आणणारे बहुजन समाजाचे सर्वमान्य लोकनेते होते. त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी टाकली चे सरपंच तथा जेष्ठ पत्रकार किसनरावजोर्वेकर, माजी नगरसेवक संजय घोडे, भाजप तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, बेलगंगेचे संचालक जेष्ठ नेते उध्धवराव महाजन यांनी केले तर कार्यक्रमासाठी राजेंद्र राठोड (संचालक जे.डी.सी.सी. बँक जळगाव) श्री.सुरेशभाउ स्वार (नगरसेवक न.पा.).भाउसाहेब जगताप,,रमेशजी निकम,डॉ.सुभाषजी निकुंभ, नगरसेवक बाप्पु अहीरे,दिलीपजी गवळी, माजी जी प सदस्य शेषरावबाप्पु पाटील, सी एम चषक जिल्हा संयोजक कपिल पाटील, जेष्ठ युवा मोर्चा नेते विवेक चौधरी,राकेश नेवे, अरूण पाटील,संजय चौधरी,राजेंद्र मांडे , राजेंद्र पगार,सचीन आव्हाड, गौरव चौधरी,रुपेश पाटील सर, मनोज सुर्यवंशी सर, गोरख साळुंखे,योगेश खंडेलवाल,जितेंद्र वाघ, संजय वा.चौधरी यांची प्रमुख उपस्थित होते.
मुंडेंचा आवडता तालुका
चाळीसगाव तालुका हा भारतीय जनता पक्षाचे कुशल संघटन ,कौशल्य, शिस्तबद्धता असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेले तालुका म्हणून मुंडे साहेब यांचा आवडता होता.सर्वाधिक प्रभाव शाली बूथ रचना, गावोगावी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे , स्व. मुंडेसाहेब याचे आदेशाने पक्षाच्या भूमिकेसाठी तुटून पडणारे कार्यकर्ते अशी भक्कम पक्ष रचना या तालुक्याची होती. यामुळे येथील अनेक कार्यकर्त्या वर मुंडे साहेब यांनी व्यक्तिशः प्रेम केले ज्यावेळी त्यांचा उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू व्हायचा त्याची सुरुवात ते चाळीसगाव येथून करायचे, अशी आठवण यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली.