यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार मिळल्याबद्दल केला गौरव
चाळीसगाव – सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व सामान्य जनतेसाठी रयत सेनेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याने त्यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने मुंबई येथे यशवंतराव चव्हाण युवा मंच च्या वतीने कोपरखैरने येथे सन्मानित करण्यात आल्याचे प्रतिपादन कबीर फॉउंडेशनचे अध्यक्ष सप्निल जाधव यांनी ५ ऑक्टोबर रोजी भडगाव रोड कॅप्टन कॉर्नर येथे रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सत्काराप्रसंगी केले.
सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी केल्याबद्दल त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन यशवंतराव चव्हाण युवा मंचतर्फे मुंबई येथे सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनाचा सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील कोपरखैरने येथे करण्यात आला होता. यावेळी रयत सेनेला यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने सन्मानित करून पुरस्कार संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार व पदाधिकारी कार्यकर्त यांना प्रसिद्ध सिने अभिनेत्री अंशुमाला पाटील, कवीता राम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला होता. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल चाळीसगातील कबीर फाउंडेशन, डॉ.आंबेडकर चौक, बु.रुपलाल वस्ताद व्यायाम शाळा, पंचम बहु संस्था, मनसे, रोटरी क्लब, कॅप्टन कॉर्नर मित्र परिवार यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यांचा केला सत्कार
संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष दिपक चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, गौरव पाटील, योगेश पाटील, गणेश देशमुख, सागर चव्हाण यांचा संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कबीर फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील (बंटीभाऊ) जाधव, श्रीकांत राजपूत, राहुल वाकलकर, युवा व्याखाते प्रदीप देसले, पंचम बहु संस्थेचे सचिव संभा जाधव, गाव सेनेचे गोरख साळुंखे, कुलदीप चौधरी, तात्यासाहेब जाधव, निलु महाले, विजय जाधव, शरद जाधव, संजय केदार, जयदीप पाटील, अतुल, पंकज, सागर सोनार, सागर देशमुख, अशोक जाधव, शुभम मोरे, सोनूजी जाधव, प्रशांत जाधव आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.