अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अधिकार्यांनी केल्या सूचना
चाळीसगाव :- अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शुक्रवारी जनक्षोभ उसळला होता. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव विभागात शांतत रहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी विभागातील पोलीस उपअधीक्षक तसेच पोलीस निरीक्षक यांना दूरध्वनीद्वारे बंदोबस्त वाढवण्याची सूचना करीत गस्त वाढवण्याचे आदेश दिले.
सोशल मिडीयांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे बच्छाव यांनी सांगत अफवा पसरणार्यांवर आम्ही कारवाई करू, असे त्यांनी सांगत जनतेने शांतता ठेवावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.