चाळीसगाव शहरात दैनंदिन स्वच्छतेसाठी पालिकेने कंबर कसली

0

शिवाजी घाट भाजीपाला मार्केट परिसरात रात्रीची घंटागाडी : नदी पात्राची अस्वच्छता थांबणार

चाळीसगाव- शहरातील सर्वच प्रभागामध्ये एकूण 27 ठिकाणी कचरा वर्गीकरण प्रात्याक्षिके देण्यात आली असून वर्गीकृत कचरा संकलन करून घेण्यात आला.तसेच घर ते घर जाऊन एकूण 178 भागधारकांची स्टीकर द्वारे जनजागृतीसाठी करून त्यांना स्वच्छ सर्वेक्षण 2019 बद्दल माहिती देण्यात आली. असून पालिकेने कचरा वर्गीकरण प्रात्याक्षिकांची जनजागृती चा धडाका लावला असून मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात रात्रीची घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने नदी पात्राची अस्वच्छता थांबणार आहे. शहर स्वच्छतेबाबत पालिकेने कंबर कसली आहे. प्रभाग क्र. 1,3,6,7,9 यां प्रभागानमध्ये एकूण 29 कचरा वर्गीकरण प्रत्याषिके देण्यात आली व भागधारकान कडून वर्गीकृत कचरा संकलित करून घेण्यात आला. तसेच घर ते घर जाऊन एकूण 182 भागधारकांची स्टीकर द्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 4 येथे एम.जी नगर याठिकाणी लक्ष गट चर्चा घेण्यात आली त्यात एकूण 25 भागधारक उपस्थित होते प्रभाग 6 मधील नेताजी पालकर चौक येथील रेणुका माता मंदिर परिसरात लक्ष गट चर्चा घेण्यात आली. त्यामध्ये एकूण 28 भागधारक उपस्थित होते. यावेळी आरोग्य निरीक्षक संजय गोयर यांचे सह सिटी समन्वयक व ग्रीनी टीम मेम्बर्स उपस्थित होते.

भाजीपाला मार्केट जवळ रात्रीची घंटागाडी
शहरातील विविध भागात भाजीपाला विक्री करणारे हातगाड्या लावल्या जातात यात प्रामुख्याने शिवाजी घाट , भडगाव रोड , स्टेशन रोड वरील फेरीवाले यांचे कडून रात्री चे वेळी कचरा गोळा करून नदी पात्रात व उघड्या वर टाकला जातो यासाठी सायंकाळ पासून या भागात घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे हा कचरा लगेचच गोळा करून घेण्यात येत आहे यामुळे या परिसरातील दुर्गंधी व होणारी घाण कमी होऊन परीसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, असे पालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर म्हणाले.