चाळीसगाव : चाळीसगाव शहर व तालुक्यात सट्टा, जुगार गावठी दारू भट्ट्या, बनावट दारु, भांग गांजा, चरस, गुटखा आदी अवैध धंदे सुरु आहेत. निवेदन मिळताच तात्काळ चाळीसगाव शहर व तालुक्यातील अवैधधंदे बंद करावेत तरी येत्या 8 दिवसात म्हणजे 19 डिसेंबर 2017 पर्यंत अवैध धंदे बंद न झाल्यास 20 डिसेंबर 2017 रोजी संभाजी सैनिक चाळीसगाव शहर व तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी ज्यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व सुरू आहे त्यांच्याविरोधात शहराच्या मध्यवर्ती ठिकाण शहर पोलीस स्टेशन समोर सट्टा पत्ते खेलो आंदोलन करतील याची नोंद असा इशारा संभाजी सेनेतर्फे करण्यात आले.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
शहर पोलीस स्टेशन समोर सट्टा पत्ते खेलो आंदोलन करतील असा ईशारा देवुनकायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणार्या सर्वच परिस्थितीस सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसेच मान्य .दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री ग्रामीण डॉ.रणजित पाटील गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव अतिरिक्त महासचिव गृह विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविले आहेत. त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग चाळीसगाव पोलीस निरीक्षक चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव ग्रामीण यांना देखील दिले. निवेदन देतेवेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांसह गिरीष पाटील, सुरेंद्र महाजन, अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे, प्रवीण पाटील, महेंद्र सिंह राजपूत, बापूराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.