चाळीसगाव । चाळीसगाव शहर हे जिल्ह्यातील चांगले शहर व आदर्श शहर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिकेच्या माध्यमातून कसे करता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार उन्मेशदादा पाटील यांनी 12 रोजी चाळीसगाव नगरपालिकेत नगरपालिकेचे कामकाज व आढावा संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. गेल्या 4 महीन्यात शहराच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या माध्यमातून सत्ता दिली त्यात 2 अपक्ष व 2 सेनेच्या नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन करून शहराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे सांगून शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. शहरातील रस्त्यांची जवळपास 4 कोटींची कामे केली आहेत. या बैठकीत शहरातील 100 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करण्यात आली.
आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, रा.शि.प्र.मंडळाचे संचालक विश्वास भाऊ चव्हाण, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, आनंद खरात, हिरा बजाज, विजया पवार, चंद्रकांत तायडे, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शहरात भुयारी गटार तयार करण्यासंदर्भात बैठक घेऊन तो विषय हाती घेतला आहे. यासाठी आराखडा तयार करून तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली आहे. लवकरच हा निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे शहरातील जनतेला 365 दिवस 24 तास पाणी देण्याचा प्रस्ताव सादर करणार आहोत. जेवढे पाणी वापरले जाईल तेवढे बील आकारण्यासाठी 24 तास पाणी देणार, 2 महीन्याच्या आत शहरातील भुयारी गटारी संदर्भात गुगल मॅप व सर्व्हे करून भुयारी गटारींचा प्रस्ताव सादर करणार, शहरात 10 पेक्षा जास्त झोपडपट्ट्यांसाठी घरकुल योजनेसाठी चाळीसगाव नगरपालिकेची पहीली बैठक घेऊन गरजूंना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. खरजई रोड, घाट रोडच्या रस्त्याची स्थिती अती बिकट असून तात्काळ या रोडचे काम करून घाट रोड धुळ मुक्त करणार, गरजूंना अल्प दरात आरोग्य तपासणी व उपाययोजना करण्यात आले. बेटी बचाव बेटी पढाओ योजने अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजनेनुसार मुलीच्या नावे 21 हजार 500 रूपये बँकेत ठेवणार आहेत.
लोकांसाठी निवारा योजनाची तयारी
अनियमीत कामगारांना 2 कोटी 40 लाख रूपये कराचा पैसा पगार म्हणून द्यावा लागतोे. येणार्या बैठकीत 17 अनुकंपा व 23 अनियमीत कामगारांना नियमीत करण्यासंदर्भात बैठक घेणार असून त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात निवारा नसलेल्या अशा लोकांना निवारा योजना आणून त्यासाठी बामोशी बाबा दर्ग्याजवळ अद्यावर इमारत व गार्डन उभारणार असून त्यासाठी 1 कोटी 30 लाख रूपये मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवृत्त कर्मचार्यांबद्दल बोलतांना त्यांची देणे देणी बाकी आहेत. त्याचाही पाठपुरावा करून योग्य न्याय देण्याच प्रयत्न करणार आहोत.