बकरी ईद व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर होते आयोजन
चाळीसगाव । मुस्लीम बांधवांची बकरी ईद तसेच आगामी गणपती, दहीहंडी, दुर्गा देवी उत्सव आदी सणांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील होते तर प्रमुख उपस्थिती व्यापारी असोसिएशनचे प्रदीपदादा देशमुख, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, कृउबा माजी सभापती रमेश चव्हाण, विज वितरणचे विजयसिंग पाटील, तुषार नकवाल, सपोनि राजु रसेडे, वाहतुक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोउनि विजयकुमार बोत्रे, राजेश घोळवे, युवराज रबडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, संजय पाटील, आण्णा कोळी, आनंद खरात, दिपक पाटील, चंद्रकांत तायडे, जगदीश चौधरी, चिराग शेख, भूषण ब्राम्हणकार, फकीरा मिर्झा, माजी नगरसेवक गफुर पहेलवान, दिलावर मेंबर, अल्लाउद्दीन शेख, पत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर डी चौधरी, कैसर खाटीक, रियाज प्रींस, लुकमान शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदीपदादा देशमुख म्हणाले की शांतता कमिटी बैठकीत प्रमुख अधिकारी उपस्थित राहीले पाहीजेत येणारे 2 ते 3 महीने हे सण उत्सवाचे महत्वाचे आहेत आपण हिंदु मुस्लिम बांधवांचे सण चांगल्या पद्धतीने साजरे करतो ही आपली परंपरा आहे असे सांगुन हिंदु मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सर्व प्रथम येणार्या बकरी ईद व गणपती, दहीहंडी आदी सणांच्या हिंदु मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच भारतातील एकमेव शहर चाळीसगाव आहे जेथे हिंदु मुस्लिम वाद होत नाहीत असे सांगुन हिंदु असो व मुस्लिम सण याची आपण काळजी घेतली पाहीजे बकरी ईद नेमकी श्रावण महीन्यात आल्याने मुस्लिम बांधवांनी पशूंचा बळी देताना काळजी घ्यावी कोणाच्या भावना दुखावणार नाहीत हे लक्षात घेवुन उघड्यावर मांस नेवु नये बळी दिल्यावर जे अतिरीक्त मांस अथवा वस्तु असतील त्याची योग्य विल्हेवाट लावावी सणासुदीला पोलीस प्रशासन सज्ज असुन कायद्याचे पालन करावे काही घटना घडल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे कायदा हातात घेवु नये असे आवाहन करुन जे उपद्रवी आहेत त्यांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले असुन त्यांना तडीपार करण्यात येईल असे सांगीतले. प्रास्ताविक सपोनि राजु रसेडे यांनी केले तर यावेळी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, सपोनि सुरेश शिरसाठ, नगरसेवक रामचंद्र जाधव, आनंद खरात, आण्णा कोळी, चंद्रकांत तायडे, संजय पाटील यांच्यासह पत्रकार आर डी चौधरी, अल्लाउद्दीन शेख, गफुर पहेलवान, दिलावर मेंबर, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, कैसर खाटीक, लुकमान शहा, न पा चे तुषार नकवाल, विज वितरण चे विजयसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शांतता समिती सदस्य, हिंदु, मुस्लिम बांधव, पत्रकार बांधव उपस्थित होते .