चाहत्यांच्या प्रतिसादामुळे विकी कौशल भारावला

0

मुंबई : ‘मसान’ चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या विकीला ‘राझी’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. आता विकी कौशलचा ‘उरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून विकी कौशल भारावला आहे.

https://twitter.com/VijayRajNaikodi/status/1084299523663360000

‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून भारतीय सैन्याचे शोर्य आणि सर्जिकल स्ट्राईकचा थरार पडद्यावर उलगडण्यात आलाय. यात विकीने कमांडोची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाला चाहते भरभरुन दाद देत आहेत.