चिंचखेड्याच्या विवाहितेचा मृत्यू, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ: विवाहितेचा छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथील सासर असलेल्या मालू उर्फ रीना पंडित इंगळे (32, चिंचखेडा) या विवाहितेने सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी योगेश रघुनाथ वानखेडे (26, रा.चिखली) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी तथा पती पंडित नथ्थू इंगळे, ईश्‍वर नथ्थू इंगळे, मंडाबाई नथ्थू इंगळे, नथ्थू पुना इंगळे (चिंचखेडा बु.॥) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी 9 मे च्या अंदाजे एक वर्षानंतर ते 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत मयत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून चारीत्र्यावर संशय घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार करीत आहेत.