चाळीसगाव – चिंचगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालय व प्रा.आ. केंद्र लोंढे यांच्या संयुक्तविद्यमाने 14 वा वित्त आयोग योजना सन 2017-18 अंतर्गत महिलांची व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार उन्मेष पाटील यांच्या हत्से दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उप सभापती दिनेश बोरसे, पंचायत समिती सदस्य कैलास पाटील, सदस्य सुनील पाटील तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच, प्रा आ. केंद्र लोंढेचे वैद्यकीय अधिकारी राजेश चौधरी, सचिन खेडकर यांच्यासह चिंचगव्हाणच्या सरपंच अनिता राठोड, सुभाष राठोड, ग्रा प सदस्य भोला पाटील, सतीश बागुल, पुरुषोत्तम निकम, रंजनाताई पाटील, ग्रामसेवक तानाजी भोसले, पंकज चव्हाण उपस्थित होते.