चिंचवडगावात रविवारी सबनीस यांचे व्याख्यान

0

चिंचवड : फुले आंबेडकर गुरुशिष्य जयंती महोत्सव दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.चिंचवडगावातील येथील जिजाऊ गार्डनमध्ये शनिवारी व रविवारी सायंकाळी साडेपाचला व्याख्याने होतील. यामध्ये अनुक्रमे नागेश गवळी यांचे ‘संघर्षगाथा जोतीरावांची’ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे ‘भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले’ या विषयावर विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.