पिंपरी-चिंचवड। तुला दोन्ही मुलीच झाल्या म्हणून, पतीकडून होणार्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भगवान वाघ (वय 43, रा. आनंदवन सोसायटी, चिंचवड) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी मयत सुनीता सतीश वाघ (वय 29) यांच्या आई शकुंतला जाधव यांनी काल चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनीताला दोन्ही मुली झाल्या म्हणून सतीश तिला मारहाण करत असे, शिवीगाळ करत असे व तिचा मानसिक शारीरिक छळ करत असल्यामुळे या छळाला कंटाळून सुनीताने 23 जुलै रोजी राहत्या घरी रात्री नऊ वाजता विषारी औषध पिले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा 26 जुलै रोजी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी पती विरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पती अद्याप ताब्यात नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.