पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – महापालिकेतर्फे महापौर चषक माजी महापौर विलास लांडे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे येत्या मंगळवारी व बुधवारी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण चार लाख 22 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
आठ गटात स्पर्धा
या स्पर्धा दोन गटात होणार आहेत. पुरुष विभागात 50,56, 62, 69, 77, 85, 94, 105 आणि 107 किलोंवरील असे एकूण नऊ वजन गट आहेत. महिला विभागात 44,48,53,63, 69,75 आणि 75 किलोंवरील असे एकूण आठ गट आहेत. स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद व उपविजेतेपद आणि वैयक्तिक बक्षिसे आहेत.
107 खेळाडूंचा सहभाग
स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकूण 107 खेळाडू सहभागी होणार आहेत. नागरिक व खेळाडूंनी या स्पर्धेस उपस्थिती लावून आंनद घ्यावा, असे आवाहन महापौर काळजे यांनी केले आहे.