चिंचवड : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने भारतरत्न जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा चिंचवड येथे बुधवारी (दि. 29) ऑटो क्लस्टरमध्ये सायंकाळी चार वाजता होणार आहे. टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर. ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार भोसरी येथील प्लॅनेट टूल्सचे संचालत श्रीराम हंडीबाग. उद्योग विभूषण पुरस्कार तळवडे येथील आर्या इंडस्ट्रीजचे दिपक फल्ले, उद्योगभूषण पुरस्कार पिंपरी येथील प्रजापती फाऊंड्रीचे राजेश प्रजापती व भोसरी येथील हेब प्रिसीजनचे दिनेश शहाकार, उद्योग मित्र पुरस्कार चिंचवडचे एस्क्वॉथर सोल्युशनचे अजिनाथ देवकर, उद्योग सखी पुरस्कार पुण्याच्या अॅनॉलॉजिक ऑटोमेशनच्या संचालिका अनुजा कल्याणकर यांना गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निघोजे येथील दत्तात्रय येळवंडे यांचा ही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.