चिंचवडेनगरात मनोरुग्णाची करामत

0

वीज खांबावर चढला, कसरती करत बसला, सव्वा तासांनी उतरवला

पिंपरी-चिंचवड : ऐकावे ते नवलच म्हणतात त्याप्रमाणे आज एक विशीतला तरुण एका विजेच्या खांबावर चढला होता. बरं तो तेवढ्यावरच थांबला असला तरी चाललं असतं; पण पठ्ठ्या पहाटे पाच ते सात या कालावधीत विजेच्या खांबावर कसरत करत होता. त्यामुळे सकाळी नागरिकांना धक्काच बसला. हा थरार घडला चिंचवड येथील चिंचवडेनगर येथे. समिर इन्सान खान (वय 20 रा. चिंचवडेनगर, चिंचवडगाव) असे या तरुणाचे नाव आहे.

अग्निशामक दलाने वाचविले प्राण
अग्निशमन दलाला माहिती मिळताच अवघ्या वीस मिनीटात अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवांनानाही हा प्रकार पाहून धक्का बसला. त्यांनी तातडीने वीज बंद केली व त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या तरुणाने उतरण्यास नकार दिला. त्यावेळी तरुणाने वरुन जवांनाना लाथा मारण्यास सुरुवात केली. पोलच्या टोकावर चालली ही कसरत बघ्यांना तोंडात बोट घालायला भाग पाडत होती. तातडीने रुग्णवाहीका बोलविण्यात आली. सव्वा सात ते सव्वा आठ या एक तासाच्या कसरती नंतर हा तरुण कसाबसा खाली उतरला.

मनोविकारावर औषधे सुरू
घरच्यांनी सांगितले की समीर हा मनोरुग्ण आहे. या आधीही त्याने असे धाडसी कृत्य केली आहेत. त्यामुळे आज पहाटे तो घरातून कधी उठून गेला हे त्यांनाही कळाले नव्हते. उतरल्यानंतरही समीर रुग्णवाहीकेत बसण्यास तयार नव्हता. जवानांनी त्याला स्ट्रेचवर बांधले व पुढील उपचारासाठी वासीएम रुणालयात पाठवले.

जवानांची कामगिरी
ही कामगिरी अग्निशमन दलाचे जवान अशोक कानडे, शंकर पाटील, अमोल खंडारे, मुकेश बर्व व भुषण एवले यांनी केली. मात्र या सार्‍या प्रकारानंतर उपस्थितांनी चिंता तर व्यक्त केलीच शिवाय एवढी कसरत करुनही तरुणाला साधे खरचटलेही नाही म्हणून आश्‍चर्य व्यक्त करत होते.