चिंचवड : चिंचवड येथील हनुमान मित्र मंडळाच्यावतीने दि.13 व 14 ऑक्टोबर रोजी छटपुजेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड, थेरगाव येथील विसर्जन घाटांवर ही पुजा पार पडणार आहे. त्यानिमित्त मंडळाचे अध्यक्ष विजय गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड, थेरगाव विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हनुमान मित्र मंडळाच्यावतीने 13 व 14 नोव्हेंबर रोजी दुपारी चार नंतर छटपुजेनिमि÷त्त विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड.गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, सेनेचे गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित राहणार आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले.