चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शहराच्या विस्ताराबरोबर संघटित गुन्हेगारीही फोफावत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचार्यांची सुरक्षासुद्धा तेवढीच मोलाची असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस मित्र तसेच मधुराज इंटरप्रायजेसच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यास 3 बॉडी रायट गियर हे सुरक्षा पोषाख भेट देण्यात आले. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक डी. जी.कांबळे, पोलीस मित्र सुभाष मालुसरे, विजय पाटील, गोपाळ बिरारी, अर्चना घाळी-दाभोळकर, बाबासाहेब घाळी उपस्थित होते.
हे देखील वाचा
सामाजिक संस्थांकडून मोलाची साथ…
पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, उत्सव असो किंवा पालखी सोहळा पोलीस मित्र परिवाराचे सदस्य हे सामाजिक संस्था वा सुरक्षा समितीच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला मोलाची साथ मिळत आहे. अनेक वर्षांपासून हा मित्र परिवार, एसपीओ नागरिक तसेच पोलिस कर्मचारी यांच्या सुरक्षेकरिता दक्ष असतो. आज मिळालेल्या ह्या सुरक्षा पोषाखामुळे दंगलग्रस्त परिस्थितीत पोलीस कर्मचारी नक्कीच सुरक्षित असेल.