चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचा आनंदोत्सव

0

मध्य रेल्वे विभागाकडून अनेक मागण्यांची पूर्तता
आकुर्डी स्थानकावर अधिकारी, कर्मचार्‍यांना भरविले पेढे

पिंपरी-चिंचवड : चिंचवड प्रवासी संघाने मध्य रेल्वे विभागाने विविध मागण्यांपैकी काही प्रमाणात मागण्या पूर्ण केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. आकुर्डी येथील तिकीटघर व खिडकी सुरु झाल्याबद्दल चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने येथील लोकलने प्रवास करणारी महाविद्यालयील युवती व विद्यार्थी व अर्चना बांडे, आदित्य पोटरे, आयुषकुमार सिंग यांच्या हस्ते आकुर्डी रेल्वे स्थानक प्रमुख रामरतन रझाक, तिकीट पर्यवेक्षिका मोनिका महाडीक, कनिष्ठ पर्यवेक्षिका दिपाली फरड, आर.पी.एफ. पोलीस निरीक्षक एम. आर. खान यांना पेढे भरवण्यात आले. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री. भालदार, पदाधिकारी नारायण भोसले, रहेमान गवंडी (जमादार), डॉ. पौर्णिमा कदम, गिता कांबळे, परमेश्‍वर गोफणे, तात्या मंजूगडे आदींनी पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. पुणे विभागोचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर आदींचे आभार मानले.

आरक्षण खिडकी सुरू करावी : भालदार
आकुर्डी येथे आरक्षण खिडकीचे काम युध्दपातळीवर करावे, असे आवाहन चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केले. आकुर्डी येथील तिकीटघर 24 ऑक्टोबर 1991 साली त्यावेळचे क्षेत्रीय अधिक्षक पी. जी. मंगळूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्राधिकरण प्रवासी संघ व चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मार्च 1991 साली विविध मागण्यासाठी चिंचवड येथे प्रवासी संघाच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसले होते.

प्रवासी संघाचा पाठपुरावा
मुंबई येथील बैठकीत चिंचवड प्रवासी संघाला त्यावेळीचे वरिष्ठ विभागीय अधिक्षक अशोक चौधरी यांनी आकुर्डी येथे तिकीट घर बांधण्याचे चिंचवड प्रवासी संघाला लेखी पत्र दिले होते. आकुर्डी येथे पश्‍चिम बाजूला तिकीट घर व आरक्षण खिडकी रावेत, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी येथील रहिवासींयासाठी सुरु करावी ही मागणी सन 1997 सालापासून करण्यात आली व त्याचा पाठपुरावा केल्यानंतर चिंचवड प्रवासी संघाला नुकतेच लेखी पत्र दिले.

कर्मचारी वाढीनंतर खिडकी
त्यानुसार आकुर्डी येथील पश्‍चिम बाजूला मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अनारक्षित तिकीट घराचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहील. कर्मचारी वाढीनंतर दुपारी 2 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत तिकीटघर सुरु करण्यात येईल. एक्सप्रेस गाडयांचे देशभरातील आरक्षण तिकीट खिडकी लवकरच सुरु करण्यात येईल असे रेल्वे अधिकार्‍यांनी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांना सांगितले. या तिकीट घरात अनारक्षित गाडयांचे, लोकलचे तिकीटे, मासिक, त्रैमासिक पास मिळणार आहे.