चिंचवड, वाल्हेकरवाडीत कारवाई

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 16 चिंचवड, मोरया गोसावी गणपती मंदिरासमोरील फुटपाथवरील पत्राशेडवर पालिकेने हातोडा चालविला. तसेच वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत घरांवर पालिकेची कारवाई सुरु आहे. मंदिरा शेजारी पालिकेचे 25 गाळे आहेत.

पालिकेने हे गाळे भाडेतत्वार दिले आहेत. भाडेतत्वारील गाळ्यासमोरील फुटपाथवर पत्राशेड टाकले होते. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे मुश्कील झाले होते. मंगळवारी पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने या पत्राशेडवर धडक कारवाई केली. तसेच चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील दोन आरसीसी अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली असून पालिकेच्या अनधिकृत बांधकामवरील कारवाई सुरू आहे.