चिंचोली गावातील आदिवासी तरुणी बेपत्ता

यावल : तालुक्यातील चिंचोली येथून 20 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून याबाबत यावल पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली. अनिता देवराम पावरा (20, चिंचोली) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.

पोलिसात तक्रार
यावल तालुक्यातील चिंचोली येथे विटा थापण्याच्या कामासाठी वाघझिरा येथील आदिवासी कुटुंबीय गावातील सार्वजनिक विद्यालयाजवळ वास्तव्याला आहे. रविवारी देवराम पावरा यांची मुलगी अनिता देवराम पावरा (20) ही सोमवार, 25 सायंकाळी सहा वाजता सुमारास काहीही न सांगता बेपत्ता झाली. शोध घेवूनही ती न सापडलयाने मंगळवार, 26 एप्रिल रोजी देवराम पावरा यांनी यावल पोलिस तक्रार दिल्यानंतर हरविल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, श्याम पवार करीत आहे.