यावल : तालुक्यातील चिंचोली सार्वजनिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून 36 हजार 630 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचोली शाळेचे उपशिक्षक रवींद्र पुरूषोत्तम रावते (किनगाव बु.॥) यांनी प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
शाळेच्या कार्यालयातून साहित्य लंपास
15 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी शाळेच्या व्यवसाय शिक्षण विभागातील खोलीचा कडी-कोयंडा तोडून त्यातील अॅम्प्लीफायर, आठ फॅन, दोन ग्रायंडर मशीन, ईलेक्ट्रॉनिक मोटार, केबल, हॅमर, मल्टीमीटर, शालेय पोषण आहाराचे खिचडी शिजवण्याचे मोठे पातेले आदी मिळून 36 हजार 630 रुपये किंमतीचे साहित्य लांबवण्यात आले.