चिंताजनक: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे: 24 तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीचा भरतातही कहर सुरू आहे. मागील 24 तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा पार केला आहे.

देशात सद्यस्थितीस ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात काल ३८७४ नवे करोना रुग्ण आढळून आले होते. २४ तासांमध्ये १६० रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर कालपर्यंत राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार २०५ पोहचली होती.. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ४.६७ टक्के आहे. राज्यात सध्या ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन अशी देखील माहिती मिळालेली आहे.