चिंबळीमध्ये केला नवनियुक्त शिक्षकांचा सन्मान

0
चिंबळी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळगाव येथे पै.युवराज सोनवणे प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष भागूजी सोनवणे सर यांनी केळगाव येथे कार्यरत असणारे व प्रशासकीय बदलीने गतवर्षी बदलून गेलेले सर्व शिक्षक व नव्याने रूजू असलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजीत केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आळंदीच्या नगरसेविका स्नेहल कुर्‍हाडे व प्रमुख अतिथी म्हणून आळंदी नगरपालिकेच्या नगरसेविका सुनिता रणधवे उपस्थित होत्या. तसेच सरपंच सोमनाथ मुंगसे, उपसरपंच अमोल विरकर व विद्यमान सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे, शाळा कमिटीचे अध्यक्ष संदिप गुंड, उपाध्यक्षा शिल्पा भांडवलकर, अतुल मुंगसे, प्रतिष्ठानचे पै.युवराज सोनवणे, डॉ.मुकुंदराव सोनवणे, शारदा सोनवणे, प्राध्यापिका निशा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंगसे, शिवाजी वहिले आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठान मदतीसाठी तत्पर
यावेळी शिक्षक विनोद चव्हाण, रेखा चव्हाण, कुंडलिक सातकर, शरद कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका सुनिता भगत, मनिषा मटाले, लगड मॅडम आढारी सर अशा सर्व गुरूजींचा सत्कार करण्यात आला. सोमनाथ मुंगसे यांनी सांगितले की, शाळेची गुणवत्ता वाढवावी व विद्यार्थी उपस्थित कसा राहिल यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील रहावे. तसेच अत्याधुनिक जागतिक ज्ञान कसे देता येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शाळेसाठी सोनवणे प्रतिष्ठान सदैव कोणतीही मदत करण्यासाठी सदैव बांधील असेल, असे वचन प्रतिष्ठान संस्थापक सुभाष सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात दिले. उपसरपंच अमोल विरकर यांनी, शाळेचे अपूर्ण बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याची सूचना ग्रामपंचायत केळगावास दिली. तसेच नवनियुक्त पोलीस पाटील युवराज वहिले यांचादेखील सोनवणे प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विनोद चव्हाण यांनी तर आभार कुंडलिक सातकर यांनी मानले.