आखाडा परिषदेच्या निर्णयाच्या निमित्ताने भोंदूपणाची चिकित्सा करणे अगत्याचे ठरते. हिंदू धर्मातील संतपरंपरेने नेहमीच धर्म आणि अध्यात्म यांची शिकवण देत भोंदू साधूंविरुद्ध जागृती केली आहे. असा प्रकार अन्य धार्मिक समूहांमध्ये विशेषरूपाने दिसून येत नाही. ननवर बलात्कार, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, समलैंगिक संबंध अशा अनेक घटना चर्चमध्ये घडल्याची वृत्ते वारंवार ऐकायला येतात. अनेक मौलवी, उलेमा हेही महिलांना, मदरशांतील मुलांना त्यांच्या वासनांधतेची शिकार बनवतात, पण याविरोधात त्या त्या धार्मिक समूहाकडून विशेष प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत नाही. असे का ? ‘काफरांना ठार मारताना मेलास, तर स्वर्गात 72 अप्सरा मिळतील’ अथवा ‘स्त्री जात हीच मुळी सीन (पाप) आहे. तिचा उपभोग घेतल्यानंतर केवळ कन्फेशन (पापाची स्वीकृती) केले, तरी सर्व पापे क्षमा होणार असून, त्याला स्वर्गप्राप्ती होईल’ अशा प्रकारचे ‘धार्मिक’ उपदेश जेथे नित्यनेमाने प्रकट केले जातात, तेथे अन्य अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. हिंदू धर्मामध्ये पाप-पुण्य, कठोर प्रायःश्चित्त कर्म आदींचा विचार केलेला आहे. सकाम कर्म-निष्काम कर्म यांमधीलही भेद सांगितला आहे. इतका सूक्ष्म विचार अन्यत्र नाही. याउलट ‘अमुक तेल लावल्याने रुग्ण बरा होतो’, ‘अमुक पंथ स्वीकारला की देवदूत येऊन व्याधी लगेच नष्ट करेल’, अशा प्रकारची भोंदूगिरी करून आयुष्यभर गरिबांना फसवणार्यांना धर्मसंस्थेकडून मरणोत्तर संतपद बहाल केले जाते. अशा धर्मसंस्थेविषयी काय बोलावे? अशा घटनांच्या वारंवारतेमुळेच कदाचित ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हज को’, अशी म्हण पडली असावी! त्यामुळे तेथे भोंदू संतांची नाही, तर खर्या संतांची सूची करावी लागेल.
सर्वच क्षेत्रांतील भोंदूंची सूची बनणे अपेक्षित!
भोंदू हा शब्द बर्याच वेळी धार्मिक क्षेत्राशी निगडित वापरला जातो, पण प्रत्यक्षात भोंदूगिरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. भोंदू राजकारणी, भोंदू पत्रकार, भोंदू वकील, भोंदू डॉक्टर अशी सूची न संपणारी आहे. आज तर अंधश्रद्धा निर्मूलन करतो’, असे सांगणार्या भोंदू पुरोगाम्यांचा तर समाजात सुळसुळाट आहे. त्या त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणार्या व्यक्ती मात्र स्वतःच्या क्षेत्रातील भोंदू व्यक्तींसंदर्भात उघडपणे बोलताना दिसत नाहीत. अशा मूकसंमतीदारांमुळेच भोंदू व्यक्तींचे अजून फावते. या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेचा निर्णय महत्त्वपूर्ण मानावा लागेल. पारदर्शकता आणि सत्याची पाठराखण हिंदूंच्या धार्मिक क्षेत्रातच विशेषत्वाने केली जाते, हेही लक्षात घ्यावे लागेल.
भोंदूबाबांविरोधात जागृती करा!
अशा भोंदूगिरीपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे जिज्ञासेने त्या त्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करणे आणि तेथे लक्षात येणार्या विकृतींना विरोध करणे. ‘योग्य काय आहे’, हे स्वतःला माहीत असेल, तर ‘अयोग्य गोष्टी कोणत्या’ हे समजते. साखरेची गोडी एखाद्याने चाखली असेल, तरच खडीसाखर आणि खडीसाखरेसारखी दिसणारी तुरटी यांतील भेद लक्षात येऊ शकतो. सनातन संस्थाही हेच कार्य आध्यात्मिक क्षेत्रात करत आहे. कुंभमेळ्यांमध्ये साधूंचा मेळा भरतो, तेथे अनेक भोंदू बाबाही येत असतात. सनातन धर्माचा काडीमात्र अभ्यास नसताना ते विदेशी भाविकांना मार्गदर्शन करतात. गांजा, मद्य आदी अभक्ष्य भक्षण करून धर्माला काळिमा फासतात. संन्याशी म्हणून मिरवून महिलांशी असभ्य वर्तन करतात. अशांच्या विरोधात जागृती करण्यासाठी सनातनने ‘भोंदूबाबांपासून सावधान!’ या विषयांवरील 4 ग्रंथांची निर्मिती केली आहे.
2015 मधील नाशिक कुंभमेळा आणि 2016 चा उज्जयनीचा कुंभमेळा येथे सनातनच्या साधकांनी भोंदूबाबांविरुद्ध कृतिशील जागृती केली. मुंबईच्या लोकलगाड्यांमध्ये खोट्या जाहिराती लावणार्या भोंदू बंगालीबाबांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या. आमचे भाविक मनाच्या लोकांना एकच आवाहन आहे की, ज्यांचा धर्माचा काडीमात्र अभ्यास नाही, अशा अंनिसवाल्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना भोंदू ठरवण्यापेक्षा ज्यांना धर्माच्या शिकवणीची आणि आचरणाची जाण आहे, अशा लोकांनी या क्षेत्रात कार्य केले, तर ते सर्वांत उपयुक्त ठरेल. यासाठी आपल्या योगदानाची अपेक्षा आहे.
-चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387