चिखलीच्या घरकूल प्रकल्पातील 168 सदनिकांची सोडत  

0
पिंपरी चिंचवड : घरकुल प्रकल्पातील 4 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत अ‍ॅटो क्लस्टर, चिंचवड येथे महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी ही घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास सहाआयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव संगणक चालक सुजाता कानडे लिपिक सुवर्णा केदारी, संकेत लोंढे, महेमुद शेख तसेच घरकुल समन्वयक अशोक हंडीबाग व दर्शन शिरुडे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
सलोख्याचे वातावरण…
नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष सोसायटी क्र.121 इमारत क्र.उ-20 चे अध्यक्ष हरीष साळवीकर, सोसायटी क्र.122 इमारत क्र.ऊ-31 चे अध्यक्ष विकास पिंगळे, सोसायटी क्र.123 इमारत क्र.उ-25 चे अध्यक्ष अकिल शेख व सोसायटी क्र.124 इमारत क्र.उ-16 चे अध्यक्ष दत्तात्रय दराडे यांचा महापौर राहुल जाधव यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे लाभार्थींना संदेश दिला.