चिखलीतील 210 लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

0

महापौरांच्या हस्ते काढली सोडत; पाच इमारतींमधील सदनिकांचे केले वाटप

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी योजना

पिंपरी- केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्राधिकरण सेक्टर 17 आणि 19 चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील 5 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकुण 210 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत शुक्रवारी 1 रोजी काढण्यात आली. चिंचवड येथील अटो क्लस्टर येथे संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमास सहा आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहा आयुक्त आण्णा बोदडे, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव, लिपिक अंजली खंडागळे, मोहिद्दीन शेख, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, आश्‍विनी शिंदे व आरती शहारे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

तात्पुरती निवड
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. 125 इमारत क्र. डी-24 चे अध्यक्ष अनिल गंगारात भोसले, सोसायटी क्र. 126 इमारत क्र. डी-23 चे अध्यक्ष प्रल्हाद रामभाऊ कांबळे, सोसायटी क्र. 127 इमारत क्र. डी-21 चे अध्यक्ष गोविंद गुंडेराव तांबवाडे, सोसायटी क्र. 128 इमारत क्र. सी-33 चे अध्यक्ष संजय कोंडीबा शिंदे व सोसायटी क्र. 129 इमारत क्र. डी-22 चे अध्यक्ष गजानन कडू बेदरे यांचा सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लाभार्थ्यांनी मानले आभार
याप्रसंगी लाभार्थींनी हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे, असा संदेश महापौर राहुल जाधव यांनी लाभार्थ्यांना दिला. लाभार्थ्यांनी घरे मिळाल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले.