चिखलीत आज ‘सपना चौधरी’चा जलवा!

0

पुणे: संपूर्ण तरुणाईला वेड लावणारी सपना चौधरी आज पिंपरी-चिंचवड येथे येणार आहे. दत्ता काका साने फाउंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवासाठी सपना उपस्थित राहणार आहे. या उत्सवासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच चिखली परिसरात बॅनर देखील लावण्यात आलेले आहे.

‘तेरी आखियाका यो काजल’हे सपनाच खूप गाजलेल सॉंग आहे. आजही या गाण्यावर आपल्याला सपना थिरकताना दिसणार आहे. सपनाचा जलवा पाहण्यासाठी आज पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे.