चिखलीत घरफोडी; 66 हजारांचे सामान चोरीला

0

चिखली : बंद घराचे कुलुप तोडून घरातील 66 हजारांचे सामान चोरील गेले आहे. ही घटना 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान हरगुडेवस्ती येथे झाली आहे. याप्रकरणी अनिल राजाराम विश्‍वकर्मा (वय- 35, रा. हरगुडेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, विश्‍वकर्मा हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील 66 हजाराचे सामान चोरून नेले आहे. याप्रकरणी विश्‍वकर्मा यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.