चिखली रस्त्यावर दाम्पत्याला लुटले : चौघांविरुद्ध गुन्हा

0

बोदवड- रस्त्यावर चार दुचाकी उभ्या असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद करीत 25 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवून पती-पत्नीला धमकी दिल्याची घटना 12 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चिखली ते वडजी रोडवर घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात चौघा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार रंजनाबाई गौतम इंगळे (वडजी, ता.मलकापूर, ह.मु.चेंबूर, जि.ठाणे) या आपल्या पती गौतम इंगळे व मुलांसह दुचाकी (एम.एच.19 बी.सी.4090) ने चिखलीहून वडजीकडे जात असताना रस्त्यावर (एम.एच.19 ए.एच.8297) ला धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. यानंतर संशयीत आरोपी अशोक गोपाळ पाटील (चिखली) व तीन अनोळखी इसमांनी पती-पत्नीशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याने तक्रारदारासह गौतम सुपडा इंगळे, पूजा सिद्धार्थ इंगळे, आचल प्रदीप इंगळे (सर्व रा.वडजी, ता.मलकापूर) हे जखमी झाले. या प्रकारानंतर आरोपींनी 15 ग्रॅम वजनाची व 52 हजार 500 रुपये किंमतीची पोत व दहा ग्रॅम वजनाची चैन लांबवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत