चिडलेल्या मुलाने आईच्या डोक्यात घातला सिंमेटचा ब्लॉक

0
सांगवी : एक भाऊ दुसर्‍या भावाला शाब्दिक टोमणे मारत होता. त्यामुळे आईने टोमणे मारणार्‍या मुलाला विचारले की, टोमणे का करतोस, यावरून चिढलेल्या मुलाने आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. यामध्ये आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी पिंपळे गुरव येथे घडली. यावरून आईने मुलाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शामल भुजबळ (वय 55, रा. राजीवगांधी नगर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित भुजबळ (वय 35, रा. राजीवगांधी नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा फिर्यादी शामल यांचा मुलगा आहे. अमित मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी आला. तो त्याच्या भावाला शाब्दिक टोमणे मारून बोलू लागला. हा शाब्दिक टोमण्यांचा वाद वाढू नये यासाठी आई शामल यांनी मध्यस्थी करत अमितला विचारले की, टोमणे का करतोस? यावरून रागावलेल्या अमितने घराबाहेर पडलेला सिमेंटचा गट्टू शामल यांच्या डोक्यात मारला. यात शामल गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मुलाविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपीला अद्याप अटक केली नसून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.