चितोडे वाणी समाजाचे आज वार्षीक स्नेहसंमेलन

0

यावल : येथील चितोडे वाणी समाजाचे वार्षीक स्नेहसंमेलन येत्या सोमवारी 25 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पद्मालय येथे होत आहे. या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान काल 22 रोजी संध्याकाळी 7 ते 10 सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रकाश गर्गे व प्रकाश गडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. तसेच आज संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान आनंद बाजार घेण्यात आला. आनंद बाजाराचे उद्घाटन अशोक सराफ यांनी केले.

यावेळी आनंद बाजारात 10 विवीध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच रविवारी 24 रोजी मेमरी टेस्ट ’संगीत खुर्ची’ एक मिनीट स्पर्धा ’ पीठातुन गोळ्या खाणे . चमचा लिबु, कोन बनेगा जिनीयस ’चित्रकला स्पर्धां’ निबंध स्पर्धा अशा विवीध स्पर्धा घेण्यात आले. तर आज सोमवारी 25 डिसेंबरला सकाळी श्री क्षेत्र पद्मालयकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.

समाजबांधवांना उपस्थितीचे आयोजकांकडून आवाहन
यावेळी इयत्ता 1 ली ते 12 पर्यन्त प्रथम, द्वितीय व तृतीय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे दिले. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण यांना बक्षीस देण्यात येणार आहे. तरी सर्व गावाचे अध्यक्ष व सभासद सर्व समाजबांधव यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन चितोडे वाणी समाज अध्यक्ष प्रमोद गडे, उपाध्यक्ष सुनिल श्रावगी, सचिव भानुदास कवडीवाले यांनी केले आहे.