मुंबई : सध्याचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल लवकरच ‘उरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २०१६च्या ‘उरी’ हल्ल्यावर आधारित असणार आहे.
या चित्रपटाच्या प्रोमोशनच्या वेळीस विकी म्हणाला, चित्रपट किती कोटींची कमाई करतो यावर तो चांगला किंवा वाईट हे ठरवणे चुकीचे आहे. मात्र, चित्रपटासाठी निर्मात्यांनी पैसै गुंतवललेले असतात. त्यामुळे, चित्रपटाने चांगला गल्ला जमवावा अशी त्यांची निश्चितच इच्छा असते, असेही तो पुढे म्हणाला.